टीप १ – आध्यात्मिक पातळी सात्त्विकतेवर अवलंबून असते.
टीप २ – व्यक्तीतील रजोगुण हा शारीरिक स्तरावर स्थुलातून आणि सूक्ष्म स्तरावर मनामध्ये कार्यरत असतो. त्यामुळे शारीरिक हालचाली वेगाने होतात, मन चंचल असते, मनातील आवड-नावड आणि वासना यांचे केंद्र प्रबळ असते. जेव्हा ७० टक्क्यांहून आध्यात्मिक पातळी वाढते, तेव्हा स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवरील रजोगुणाचे प्रमाण न्यून होते. त्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक स्तरावरील हालचालीही सावकाश गतीने होऊ लागतात आणि तिचे मनही स्थिर अन् शांत होते. व्यक्तीची १०० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर तिच्यातील रजोगुण पूर्णपणे नष्ट होतो.
टीप ३- व्यक्तीची ७० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर तिच्या देहातील घाम, मल आणि मूत्र यांच्यामध्ये तमोगुण स्थूल स्वरूपात कार्यरत असतो. या पातळीला व्यक्तीचा सूक्ष्मदेह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांतील तमोगुणाचे सूक्ष्म स्तरावरील प्रमाण न्यून होऊन तो १०० टक्के आध्यात्मिक पातळीला पूर्णपणे नष्ट होतो.
२. अन्य सूत्रे
२ अ. आध्यात्मिक पातळी किमान ५० टक्के असण्याचे महत्त्व : व्यक्तीची आध्यात्मिक पातळी, म्हणजे तिच्यातील सत्त्वगुणाचे प्रमाण किमान ५० टक्के असेल, तरच तिला साधनेमुळे विविध प्रकारच्या अनुभूती येतात. जर तिची पातळी ५० टक्क्यांहून अधिक असेल, तर तिचा साधनेकडे कल वाढून मायेकडे असणारा कल न्यून होतो. त्यामुळे व्यक्तीच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ ५० टक्के पातळीनंतर खर्या अर्थाने चालू होतो.
२ आ. व्यक्तींच्या प्रकृतीनुसार त्यांच्याकडून होणार्या कर्माचे स्वरूप : सात्त्विक व्यक्तीचा कल पुण्यकर्म किंवा साधना, राजसिक व्यक्तीचा कल सकाम कर्म आणि तामसिक व्यक्तीचा कल पापकर्म करण्याकडे असतो.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |