उधमपूर (जम्मू-काश्मीर) – येथे पोलीस व्हॅनमध्ये दोन पोलिसांचे मृतदेह सापडले. यांपैकी एक चालक, तर दुसरा हवालदार होता. एक शिपाई किरकोळ घायाळ झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हवालदाराने आधी चालकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे सांगितले जात आहे.