Taslima Nasreen : बांगलादेशासाठी स्वतःचे १७ सहस्र सैनिक गमावलेला भारत शत्रू, तर ३० लाख लोकांना मारणारा पाक मित्र !

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांची बांगलादेश सरकारवर कठोर टीका

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशाला त्याच्या शत्रू पाकिस्तानपासून वाचवतांना १७ सहस्र सैनिकांनी जीव गमावलेला भारत आता बांगलादेशाचा शत्रू आहे. १ कोटी निर्वासितांना निवारा, अन्न आणि कपडे देणारा भारत आता शत्रू आहे. पाकिस्तानी सैन्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी शस्त्रेे आणि प्रशिक्षित स्वातंत्र्यसैनिक देणारा भारत आता शत्रू आहे. या उलट ३० लाख लोकांना मारणारा आणि २ लाख महिलांवर बलात्कार करणारा पाकिस्तान आता कथितपणे मित्र आहे, अशा शब्दांत बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेशाने पाकला जवळ करून भारताला शत्रू ठरवल्याच्या भूमिकेवर टीका केली. त्यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.

तस्लिमा यांनी पुढे म्हटले की, आतंकवादी निर्माण करण्यात पहिल्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान आता बांगलादेशाचा मित्र झाला आहे. वर्ष १९७१ च्या अत्याचारांबद्दल बांगलादेशाची क्षमा न मागणारा पाकिस्तान आता त्याचा मित्र बनाला  आहे.


हे पण वाचा –

♦ Bangladesh-Pakistan Security Clearance : बांगलादेशाने पाकिस्तानी नागरिकांना देशात ‘सुरक्षा अनुमती’ न घेताच प्रवेश घेण्याची दिली अनुमती !
https://sanatanprabhat.org/marathi/861283.html