‘२४.८.२०२४ ते १.९.२०२४ या कालावधीत श्री गणेशोत्सवाच्या निमित्त वेगवेगळ्या गावांमध्ये प्रवचने आयोजित केली होती. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. प्रार्थना करतांना ‘देवतांची कृपा आणि चैतन्य’ यांमुळे प्रकाशरूपात गुरुकृपा अनुभवणे
मी प्रवचन चालू करण्यापूर्वी प्रार्थना करत होतो. त्या वेळी मी डोळे मिटल्यावर मला प्रकाशरूपी अस्पष्ट मूर्ती दिसत असे. ‘देवतांची कृपा आणि चैतन्य’ यांमुळे मला प्रकाशरूपात गुरुकृपा अनुभवता आली.
२. मी विषय मांडत असतांना मला संबंधित देवतेशी एकरूपता जाणवत होती. मला देवतांचे अस्तित्व जाणवत असे.
३. मला माझ्या सहस्रारावर संवेदना जाणवत असे. मला हलकेपणा जाणवत असे.
४. प्रवचन झाल्यावर माझा थकवा आणि त्रास दूर होत असे. माझा उत्साह वाढून मला आनंद मिळत होता.
५. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होणे
पूर्वी मला प्रतिदिन सायंकाळी ‘शरीर दुखणे आणि शरीर पिळवटून निघणे’, असे त्रास होत असत. रात्री माझी अस्वस्थता वाढत असे. पूर्वी माझ्याकडून नामजपादी उपाय आणि व्यष्टी साधना अल्प होत असे. मागील काही वर्षांपासून या त्रासामुळे सायंकाळी ७ वाजल्यानंतर माझी व्यष्टी साधना होत नव्हती; मात्र गुरुकृपेने आता माझे त्रास न्यून झाले आहेत. मी आता रात्रीही नामजप आणि स्वयंसूचना सत्रे करू शकतो.
गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सद्गुरु स्वाती खाडये यांच्या कृपेने माझ्यासाठी हा चमत्कारच आहे.’
– श्री. किरण विलास पोळ, तासगाव, जिल्हा सांगली. (२३.१०.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |