माझी गोड मायमाऊली, पू. (सौ.) अश्विनीताई ।

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु (टीप १) नित्य वसती ज्यांच्या अंतरी ।
अध्यात्मात आहेत मोठ्या जरी वयाने लहान आहेत तरी ।। १ ।।

करतात लहान-थोरांवर सदा वर्षाव प्रेमभावाचा ।
रात्रंदिवस ध्यास त्यांना केवळ साधकांच्या प्रगतीचा ।। २ ।।

सुश्री (कु.) सविता जाधव

हसणे इतके गोड की, पाहूनी साधक भावविभोर होती ।
तत्त्वनिष्ठा इतकी की, चूक ऐकूनी साधक अंतर्मुख होती ।। ३ ।।

प्रसंग असो आध्यात्मिक वा व्यावहारिक ।
साधनेचे मर्म समजावूनी परिपूर्णता शिकवती  ।। ४ ।।

अशी माझी गोड मायमाऊली पू. (सौ.) अश्विनीताई ।
मला घडवण्या श्री गुरुदेवांनी दिली आध्यात्मिक आई ।। ५ ।।

चरणी तिच्या शरण जाऊनी करते मी प्रार्थना ।
कृतज्ञतेने आशीर्वाद मागते मी पुनःपुन्हा ।। ६ ।।

टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले

– सुश्री (कु.) सविता जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक