Israel Accepts Responsibility Of Pager Attack : इस्रायलने स्वीकारले हिजबुल्लावरील पेजर आक्रमणाचे दायित्व !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

तेल अविव (इस्रायल) – लेबनॉनमधील जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी १७ सप्टेंबर या दिवशी त्यांच्याकडील पेजरमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट घडवण्यात आले होते. यात ४० हून अधिक आतंकवादी ठार झाले, तर अनेक जण गंभीररित्या घायाळ झाले होते. या आक्रमणामागे इस्रायल असल्याचा आरोप करण्यात आला होता; मात्र इस्रायलने त्या वेळी कोणतेही विधान केले नव्हते; मात्र आता या घटनेला ५० हून अधिक दिवस उलटल्यानंतर या आक्रमणाचे दायित्व इस्रायलने स्वीकारले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे प्रवक्ते ओमर दोस्ती यांनी ‘एएफ्पी’ वृत्तसंस्थेला सांगितले की, १० नोव्हेंबरला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नेतन्याहू यांनी लेबनॉनमध्ये पेजरवरील आक्रमणाच्या आदेशाला दुजोरा दिला. ‘संरक्षण यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकारी हे पेजर आक्रमण अन् हिजबुल्लाचा तत्कालीन प्रमुख नसरुल्ला याला मारण्याच्या कारवाईच्या विरोधात होते. विरोध असतांनाही मी आक्रमणाचा थेट आदेश दिला.

काय आहे पेजर ?

पेजर हे एक वायरलेस उपकरण आहे, जे संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी वापरले जाते. हे सहसा लहान स्क्रीन आणि मर्यादित कीपॅडसह येते. त्याच्या साहाय्याने संदेश पटकन मिळू शकतात.