येवला (नाशिक) येथील सौ. सुजाता गुप्ता यांना रामनाथी आश्रमात प्रवेश करतांना आलेल्या अनुभूती !

‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचा योग आला. आमचे वाहन आश्रमाच्या आवारात प्रवेश करत असतांना मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. सुजाता गुप्ता

१. रामनाथी आश्रम सोनेरी रंगाचा आहे. तो चैतन्याचा स्रोतरूपी गोळा आहे. या गोळ्यात मी प्रवेश करत आहे.

२. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच माझ्या देहावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर झाले आहे आणि मी पुढे पुढे जात आहे.

३. आश्रमातील वस्तू पांढर्‍या शुभ्र आहेत.

४. आश्रमातील साधक उच्च लोकातून आले आहेत. त्यांनी पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांच्या चेहर्‍यावर स्मित हास्य आहे.’

– सौ. सुजाता गुप्ता, येवला, नाशिक. (६.७.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक