
टीप – पी.पी.टी. हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.
१. श्री. प्रभाष रंजन ठाकुर, पाटलीपुत्र (पाटणा), बिहार.
अ. ‘शास्त्रीय संगीतातून मिळणारी आध्यात्मिक सकारात्मक ऊर्जा समजली.
आ. कलेच्या माध्यमातून ईश्वराच्या जवळ जाण्याचे साधन लक्षात आले.’
२. श्री. जगन्नाथ कोइराला (जिल्हा अध्यक्ष, विश्व हिंदु महासंघ, नेपाळ), पोखरा-४, कास्की, जिल्हा गंडकी प्रदेश, नेपाळ.
अ. ‘सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे’, हे या संशोधनाने सिद्ध केले.’
३. श्री. राजेश शेवाळे (विश्वस्त, दत्त मंदिर), मंचर, पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘संगीत आणि संशोधन’ ही काळाची आवश्यकता आहे. प्रत्येकाने ती सकारात्मकता जोपासायला हवी.’
४. अधिवक्ता अनिरुद्ध यादव, नालासोपारा, महाराष्ट्र.
अ. ‘भारतीय सांस्कृतिक नृत्य आणि साधना यांचे सामर्थ्य लक्षात आले.’
५. अधिवक्ता विनीत जिंदाल (उच्च आणि सर्वोच्च न्यायालय), देहली
अ. ‘हे पुष्कळ उपयोगी आहे. समाजात हा विषय आणखी पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.’
६. देवराज बी.एस्. (उद्योगपती), कुणीगल, तुमकुरू, कर्नाटक.
अ. ‘हे सर्व पाहून समाजातील लोक अनावश्यक आणि वायफळ व्यय करत आहेत अन् वेळ वाया घालवत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
आ. ‘आपल्याला काय हवे ? काय नको ?’, हे न कळल्यामुळे लोकांना स्वत:चे आरोग्यही सांभाळता येत नाही.
(सर्व सूत्रांचा दिनांक २८.६.२०२४)