औषधे घेऊनही साधकाचे वजन न वाढणे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारपूस केल्‍यावर साधकाचे वजन वाढू लागणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘काही वर्षांपूर्वी माझे वजन ३८ किलो होते. मी वजन वाढण्‍यासाठी १ वर्षभर औषधे घेत होतो; परंतु त्‍यांचा फारसा परिणाम झाला नाही. त्‍या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आलो होतो. तेव्‍हा मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला.

श्री. प्रशांत हरिहर

त्‍या वेळी त्‍यांनी मला विचारले, ‘‘वजन वाढले का ?’’ माझा भाऊ श्री. चेतन रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. मी मंगळुरूला गेल्‍यावर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनी चेतनला कळवले, ‘प्रशांतसाठी नेहमी खाऊ पाठवत जा.’ त्‍यानंतर काही मासांनी माझे वजन हळूहळू वाढू लागले. चेतनने ‘प्रशांतचे वजन आता वाढत आहे’, असे कळवल्‍यावर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांना आनंद झाला. आता माझे वजन ४७ किलो झाले आहे. ‘माझ्‍याकडून साधनेचे अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत, तरी परात्‍पर गुरुदेव माझ्‍यावर किती निरपेक्ष प्रेम करतात !’, असे मला वाटते.’

– श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू, कर्नाटक. (१.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक