जुना आखाड्यात पार पडणार सोहळा

प्रयागराज – येथे चालू असलेल्या महाकुंभपर्वात १८ जानेवारीला जुना आखाड्यात विविध आखाड्यांच्या १ सहस्र ८०० नागा साधूंना दीक्षा मिळणार आहे. शैवांचे सातरी आखाडे, तसेच दोन्ही उदासीन आखाडे यांत हे नवे नागा साधू आता साधनारत असतील.
सकाळपासूनच दीक्षाप्रदान सोहळ्यास आरंभ होईल. सर्वप्रथम शपथपत्र आणि गुरुंचे नाव दिले जाईल. त्यानंतर सर्व जण स्नान करून धर्मध्वजाजवळ बसतील. तेथे त्यांना नागा साधूंविषयीचे नियम सांगितले जातील. या संपूर्ण प्रक्रियेत नवे नागा साधू निराहार आणि निराजल रहातील. रात्री १२ वाजता ते संगमात १०८ वेळा डुबकी मारून स्नान करतील. त्यानंतर हवन आणि पिंडदान करतील आणि त्यानंतर त्यांना दीक्षा दिली जाईल.