Bangladesh ISKCON Ban Controversy : बांगलादेशातील ‘हेफाजत-ए-इस्लाम’ या जिहादी आतंकवादी संघटनेकडून ‘इस्कॉन’वर बंदी घालण्याची मागणी !

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी दिली माहिती

बांगलेदाशी लेखिका तस्लिमा नसरीन

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील चितगावस्थित ‘हेफाजत-ए-इस्लाम’ या जिहादी संघटनेने ‘इस्कॉन’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘इस्कॉन’ला ‘आतंकवादी संघटना’ ठरवून तिच्या सदस्यांना ठार मारण्याचे आवाहन ‘हेफाजत-ए-इस्लाम’ने केले आहे, अशी माहिती बांगलेदाशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करून दिली.

तस्लिमा यांनी पुढे म्हटले आहे की, बांगलादेशात इस्लामी कट्टरतावादी आणि जिहादी मोठ्या संख्येने आहेत, जे इतर धर्माच्या लोकांचे अस्तित्व सहन करू शकत नाहीत. ते हिंदु आणि इतर धर्मीय यांना हानी पोचवण्यासाठी किंवा त्यांना बांगलादेशातून हाकलण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या आणि डावपेच वापरतात.

बांगलादेशातील ‘हेफाजत-ए-इस्लाम’ आतंकवादी संघटना

संपादकीय भूमिका

‘इस्कॉन’वर बंदी घालायला ती आतंकवादी संघटना आहे का ? अशी मागणी केवळ हिंदुद्वेषातून केली जात आहे, हे उघड आहे !