PM Trudeau Admits Khalistani Presence : कॅनडातील सर्व शीख ‘खलिस्तानी’ नाहीत, तसेच सर्व हिंदू ‘मोदी समर्थक’ नाहीत ! – जस्टिन ट्रुडो, कॅनडाचे पंतप्रधान

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे दिवाळी समारंभात विधान

ओटावा (कॅनडा) – खलिस्तान्यांचे अनेक समर्थक कॅनडात आहेत; पण ते सर्व शीख समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तसेच कॅनडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही समर्थक आहेत, तेही सर्व जण हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केले. ते दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या एका समारंभात बोलत होते.

संपादकीय भूमिका

  • कॅनडामध्ये खलिस्तानी आहेत, हेच ट्रुडो आता जाहीररित्या मान्य करत आहेत. मग अशा खलिस्तान समर्थकांवर कारवाई करण्याऐवजी ट्रुडो त्यांना पाठीशी का घालत आहेत ?
  • ट्रुडो सरकारचा कालावधी काही मासांतच संपेल; परंतु तरीही त्यांना शहाणपण आलेले नाही. यावरून ‘त्यांचे खलिस्तानप्रेमी किती उफाळून चालले आहे’, हे लक्षात येते !
  • कॅनडातील हिंदू ट्रुडो यांना दिवाळी समारंभासाठी का बोलवत आहेत ? अशांना हिंदू तरी म्हणावे का ?