अमरावती (आंध्रप्रदेश) – ‘कॅनडात हिंदु मंदिर आणि अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर झालेल्या आक्रमणामुळे खूप दु:ख झाले. कॅनडातील घटना वेदना आणि चिंता दोन्हीही निर्माण करतात. मला आशा आहे की, कॅनडाचे सरकार तेथील हिंदु समुदायासाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलेल’, असे आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले. ‘विविध देशांमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचार आणि द्वेष यांच्या घटना चालूच आहेत, तरीही जागतिक नेते, आंतरराष्ट्रीय संस्था आणि तथाकथित शांतताप्रेमी स्वयंसेवी संस्था यांचे मौन त्यांना समर्थन देत आहे. आज तुम्हाला नाराजीचे सूर ऐकू येत आहेत का? हिंदूंची एकता कुठे आहे? या अन्यायाला निपटण्यासाठी आपण एकटे का आहोत?’ इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले.