रोहतक (हरियाणा) – येथे जींद-देहली मेमो या रेल्वे गाडीमध्ये स्फोट झाल्याची घटना २८ ऑक्टोबरला घडली. या स्फोटामुळे गाडीमधील ४ जण भाजले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. स्फोटामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक दाबले. हा स्फोट अपघात होता कि घातपात ?, याचे अन्वेषण करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी चालू करण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात सल्फर आणि अन्य गॅसचा वापर करण्यात आला होता.