पोलिसांकडून गुन्हा नोंद

केदारनाथ (उत्तराखंड) : येथील केदारनाथ धाममध्ये असलेल्या भुकुंट भैरवनाथ मंदिरामध्ये बूट घातलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. त्याने बूट घालून मूर्तीला हात लावल्याचे आणि दानपेटीत छेडछाड केल्याचे यात दिसत आहे. या प्रकरणाची गंभीर नोंद घेत पोलिसांनी आरोपी व्यक्तीच्या, तसेच कंत्राटदार आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
रुद्रप्रयागचे पोलीस उपअधीक्षक प्रबोध कुमार घिलडियाल यांनी सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तीची ओळख मजूर म्हणून केली आहे. धाममध्ये चालू असलेल्या पुनर्बांधणीच्या कामात गुंतलेल्या आस्थापनात काम करणारा तो मजूर आहे.