Haridwar Roshanabad Jail : कारागृहात रामलीला चालू असतांना त्‍यात वानरांची भूमिका करणार्‍या २ बंदीवानांचे पलायन

हरिद्वार (उत्तराखंड) – येथील रोशनाबाद कारागृहामध्‍ये रामलीलेमध्‍ये वानराची भूमिका करणारे २ बंदीवान सीतामातेचा शोध घेण्‍याच्‍या प्रसंगाच्‍या वेळी कारागृहातून पळून गेले. उत्तराखंडमधील रुडकी येथील पंकज आणि उत्तरप्रदेशातील गोंडा येथील रहिवासी राजकुमार अशी या बंदीवानांची नावे आहेत. पंकज खुनाच्‍या गुन्‍ह्यात जन्‍मठेपेची शिक्षा भोगत होता.

सीतामातेचा शोध घेण्‍याच्‍या निमित्ताने ते मंचावरून बांधकाम चालू असलेल्‍या अतिसुरक्षेच्‍या बराकीत पोचले. तेथे ठेवलेल्‍या शिडीच्‍या साहाय्‍याने कारागृहाच्‍या २२ फूट उंच भिंतीवर चढून ते पसार झाले. रात्री बंदीवानांची मोजणी चालू असतांना कारागृहातील अधिकार्‍यांच्‍या हे लक्षात आले. हे कारागृह ८ ते १० एकरांत पसरलेले आहे. येथे सुमारे १ सहस्र ४०० बंदीवान आहेत.

संपादकीय भूमिका

झोपलेले कारागृह प्रशासन !