पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्वातंत्र्याचा सत्य इतिहास प्रकाशित न होणे आणि त्यामागील कारणांचा मागोवा, आर्य कोण अन् कुठले ?, रामायणकाळ, आद्यशंकराचार्य आणि वास्तव, आर्यांविषयीची थाप, हिंदु संस्कृती अन् परंपरा यांच्या पाऊलखुणा जगभर पसरल्या’, हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ५३)
भाग ५२ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/835050.html
प्रकरण ९
३. हिंदु संस्कृतीला नष्ट करणारी इस्लामी राजवट !
भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण गोंधळ, म्हणजे मोठमोठ्या इमारती मुसलमान राजे-राजवाड्यांच्या कबरी म्हणून ओळखल्या जातात. त्यांची शिल्पे पूर्ण भारतीय राजपूत ढंगाची आहेत. ज्यांच्या कबरी एवढ्या भव्य, तर त्यांचे राजवाडे कुठे आहेत ? मृत झाल्यावर एवढी सोय, मग जिवंतपणाची निवासव्यवस्था काय ? ते भव्य राजमहाल कुठे गेले ? आपल्या लाडक्या मुमताजमहल या राणीला १४ व्या बाळंतपणात मरण आले. तिच्या स्मरणार्थ शहाजहान बादशाहने ताजमहाल बांधला म्हणे, मग ती जिवंत असतांना तिच्या ऐश्वर्ययुक्त रहाणीसाठी कोणता राजवाडा बांधला ? याचे उत्तर अगदी सरळ आहे. या तथाकथित कबरी मुळीच नवीन बांधलेल्या नाहीत. मुसलमानी राजवटीच्या झुंडशाहीत कुणाचेही वाडे, मंदिरे, निवासस्थाने कह्यात घ्यावीत आणि त्यात आपल्या व्यक्तीला पुरून ‘ती त्याची कबर आहे’, असे म्हणावे, हीच प्रथा होती.
३ अ. ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य ! : ताजमहाल हा जयसिंग याचा राजवाडा होता. मुमताजमहलच्या मृत्यूनंतर जयसिंगाला वाड्याबाहेर हाकलून त्याचा वाडा मुमताजला पुरण्यासाठी वापरला, त्याचे सर्व जडजवाहर शहाजहानने आपल्या कह्यात घेतले. हा मूळचा राजवाडा आहे. त्याच्या एकूण आवारात सुमारे ३०० खोल्या आहेत. खाली ५ मजले आहेत. त्यांत अनेक प्राचीन मूर्ती गाडलेल्या असण्याची शक्यता आहे.
३ आ. आक्रमकांनी बळकावलेल्या भूमींचे सखोल संशोधन व्हायला हवे ! : भारताला निधर्मी ठरवून आपण पुष्कळ मोठी घोडचूक केली आहे. या आक्रमकांच्या सक्तीने लुबाडलेल्या भूमींचे ऐतिहासिकदृष्ट्या सखोल संशोधन व्हायला हवे. आता तसे करणे, म्हणजे हिंदु-मुसलमान भांडणाचे कारण ठरणार ! तथापि अशा अनेक इमारती आणि स्थाने आजही मुसलमानी आक्रमकांनी दिलेल्या नव्या बाटग्या रूपांनी उभी आहेत.
३ इ. हिंदु संस्कृती अधारेखित करणारी; पण इस्लामी आक्रमकांनी कह्यात घेतलेली स्थाने !
१. पुण्यातील शेख सल्ला दरगाह ‘बडी’ आणि ‘छोटी’ या नावांनी ओळखल्या जाणार्या इमारती पूर्वीची पुण्येश्वर अन् नारायणेश्वर यांची मंदिरे आहेत.
२. गुजरातेतील सिद्धपूर या मातृगयेसाठी प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणाचे शिवमंदिर (लिंगमहालय) हे आज मशीद म्हणून वापरले जात आहे.
३. देहलीचा कुतुबमिनार पूर्वीचा विष्णुस्तंभ असून तो हिंदु शिल्पाचा उत्तम नमुना आहे.
४. जुन्या देहलीतील दरिबा-कलाँ या तथाकथित मशिदीच्या तळघरात अनेक हिंदु मूर्तींचे भांडार पडून आहे, असे १९४७ च्या फाळणीच्या दंग्यांच्या वेळी स्पष्ट झाले होते.
५. विग्रहराज विशालदेवाच्या शिक्षणस्थळाचा एक भाग म्हणून आता मान्य होऊनही ‘अढाई दिन का झोपडा’ हे अजमेरमधील स्थान मुसलमानी इमारत म्हणूनच आज ओळखले जाते.
६. सोमनाथाचे मंदिर स्वातंत्र्यपूर्वकाळात मशीद म्हणूनच वापरले जात होते. त्या ठिकाणी भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांनी पुन्हा सोमनाथ मंदिर उभे केले.
७. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी आजही एक मशीदच उभी आहे. हिंदूंनी तिला अगदी खेटून श्री भागवत मंदिर बांधले आहे.
८. काशीचे विश्वनाथ मंदिर आजही मशीदच बनलेले आहे. नंदीचे तोंड तिकडेच आहे. सध्या हिंदू ज्याची विश्वनाथ म्हणून पूजा करतात, ते नंतर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले मंदिर आहे.
९. काश्मीरमधील जुनी संस्कृत नावे सोनमर्ग, गुलमर्ग, दलसरोवर, वेरीनाग, श्रीनगर ही आता नाममात्रच राहिली आहेत. तेथील हिंदूंची हकालपट्टी आणि हिंदूंचे झालेले इस्लामीकरण आपल्या पिढीने पाहिले आहे.
१०. देहलीतील लाल किल्ला, निजामुद्दीन दरगाह, हुमायूनचा मकबरा, सफदरजंग मकबरा, पुराना किल्ल्यातील शेरमंडल, तुघलकाबाद, फिरोजशाह कोटला, लोधी मकबरे, रोशनआरा मकबरा इत्यादी इमारती पूर्वीच्या हिंदु इमारतींचे भ्रष्ट रूप आहे.
११. याचप्रमाणे फत्तेपूर शिक्री, आग्रा येथील किल्ला, ताजमहाल, जामा मशीद, सिकंदरा, अलाहाबाद येथील खुसरू बाग, अलाहाबादचा किल्ला, तसेच अहमदाबाद, अहमदनगर, अजमेर इत्यादी ठिकाणी अशा भ्रष्टीकरणाचे असंख्य नमुने आज त्याच भ्रष्ट स्वरूपात हिंदूंच्या दुबळेपणाला वाकुल्या दाखवत उभे आहेत.
१२. मुसलमान आक्रमकांची चरित्रे, बखरी इत्यादी त्यांनी पदरी ठेवलेल्या खुशमस्कर्यांकडून (हांजी हांजी करणार्यांकडून) लिहून घेतलेल्या आहेत किंवा चापलुशीवर पोट भरणार्या लेखकांनी लिहिलेल्या आहेत. त्या सर्वस्वी अविश्वसनीय आहेत आणि भारतीय इतिहास प्रामुख्याने असल्याच तिथी-वृत्तांच्या आधारावर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे मध्ययुगीन सुलतानाचे इतिहासातील गौरवशाली कार्य ही शुद्ध थापेबाजी समजायला हरकत नाही. निदान अन्य संबंधित पुराव्यांनी त्यांची छाननी करणे आवश्यक आहे.
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/835050.html