बिदर (कर्नाटक) येथील सरकारी शाळेतील विद्यार्थिनींनी मांडली व्यथा
बिदर (कर्नाटक) – जिल्ह्याचे पालकमंत्री ईश्वर खंड्रे यांचे गाव असलेल्या भालकी तालुक्यातील कोनामेल कुंदा मोरारजी वसतीगृह शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील इयत्ता दहावीत शिकणार्या विद्यार्थिनींनी आरोप केले आहेत की, ‘शाळेतील शिक्षक आमच्याकडे वाईट दृष्टीने पहातात आणि आमच्या शरिराला स्पर्श करतात. विरोध केल्यास परीक्षेचे ‘हॉल तिकीट’ देणार नाही, अशी धमकी दिली जाते. आम्हाला या नरकातून सोडवा.’ हे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्यानंतर पालकमंत्री ईश्वर खंड्रे यांनी ९ सप्टेंबरला शाळेला भेट दिली. या वेळी ते म्हणाले की, मी सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या भेटून त्यांची विचारपूस केली आहे. घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. समाजकल्याण विभागाच्या अधिकार्यांना शाळेला भेट देण्यास सांगितले आहे. कोणतीही अनियमितता आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
संपादकीय भूमिकासमाजाला कलंक असलेल्या अशा शिक्षकांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ! |