निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या भारतात रहाण्याच्या कालावधीची मुदत संपली !
नवी देहली – बांगलादेश(Bangladesh) आणि तिथले राजकारण यांच्याशी माझे काहीच देणे-घेणे नाही. मी तर कित्येक वर्षांपासून भारतात(India) रहात आहे. मी भारतात स्विडनची नागरीक म्हणून रहात आहे. बांगलादेशातील सध्याच्या वादापूर्वीच माझे भारतात रहाण्याची अनुमतीचा कालावधी संपला आहे. वर्ष २०१७ मध्ये तांत्रिक कारणामुळे अनुमती घेण्याला उशीर झाला होता; पण आता मोठा कालावधी उलटला आहे. लोकांना वाटते माझे सरकार आणि बडे नेते यांच्याशी ओळख आहे; पण तसे नाही. मला आता अनुमती मिळाली नाही, तर मी मरूनच जाईन. आता माझी कुठेच जाण्याची इच्छा नाही, असे विधान बांगलादेशाची निर्वासित लेखिक तस्लिमा नसरीन(Taslima Nasrin) यांनी केले आहे.
तस्लीमा नसरीन वर्ष २०११ पासून भारतात आश्रयाला आहेत. त्यांचा देशात राहण्याचा परवाना २७ जुलै या दिवशी संपला आहे. केंद्र सरकारने अद्याप त्याचे नूतनीकरण केलेले नाही.