हिंदूंवरील आघातांविषयी जागृती करण्याचा स्तुत्य ठराव !
मुंबई – सार्वजनिक उत्सवातील मांगल्य जाऊन त्याची जागा विकृतीने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जात-पात, पंथ आणि संप्रदाय यांच्याही पुढे जाऊन ‘धर्मरक्षण व्हावे, धर्म टिकला तरच धार्मिक सण-उत्सव आपण साजरे करू शकू’, या उदात्त हेतूने ‘विश्व हिंदु परिषद, कोकण प्रांत’च्या वतीने दादर येथील शिवाजी विद्यालय संकुलात स्थानिक ११७ सार्वजनिक मंडळांना एकत्र आणून ‘सार्वजनिक उत्सव महासंघा’ची स्थापना करण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते खालील सूत्रांचे पालन करण्याचा ठराव संमत
१. हिंदु समाजासमोरील धोक्यांविषयी (लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर आदी) श्री गणेशभक्तांमध्ये जागृती करावी.
२. उत्सवांचे मांगल्य आणि पावित्र्य टिकवण्याचा प्रयत्न करावा, अश्लीलता टाळावी, मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा आग्रह करावा.
३. उत्सवांच्या काळात किमान एक दिवस तरी एकत्रित येत सकल हिंदु समाजाने महाआरतीचे आयोजन करावे.
४. उत्सवकाळात सत्यनारायणाची पूजा, प्रतिदिन श्री गणेशाची आरती अशा अनेकविध पूजेचा मान विविध जाती-पंथातील जोडप्यांना द्यावा.
५. बांगलादेशमध्ये हिंदू आणि मंदिरे यांवर झालेल्या जिहादी आक्रमणाचा फलक लावून निषेध व्यक्त करावा.
६. श्रमाचा सन्मान करण्यासाठी आपल्या गणेशोत्सव मंडळाच्या परिसरातील स्वच्छता कर्मचारी, लोहारकाम करणारे, सुतारकाम करणारे, केशकर्तन करणारे, सेवक आदी श्रमजीवींचा सत्कार करावा.
या वेळी महासंधाचे निमंत्रक म्हणून विहिंपचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी कार्यभार सांभाळावा, असे सर्वानुमते ठरले, तसेच कार्यक्रमाचा समारोप इस्कॉनचे राजेश प्रभूजी यांनी केला.