
प्रयागराज, १७ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभपर्वानिमित्त येथे सहस्रो संत आणि आध्यात्मिक संस्था यांनी येथे तंबू उभारले आहेत. या प्रत्येक तंबूत वेगवेगळ्या प्रकारे साधना, उपासना, भजन आणि कीर्तन केले जात आहे. येथील सेक्टर २० मध्ये ‘स्वामी जगन्नाथ धाम ट्रस्ट, भीमगोडा, हरिद्वार’ आणि ‘श्री कल्की नारायण तीर्थ धाम प्रेरणा पीठ, कर्णावती अहमदाबाद’ यांच्या वतीने उभारलेल्या तंबूत अखंड रामनाम पठणास प्रारंभ झाला आहे. भक्तीभावाने चालू असलेल्या या रामनाम पठणामुळे येथील वातावरण राममय झाल्याची अनुभूती भाविकांना येत आहे.