५१ टक्के आध्यात्मिक पातळीची शिवमोग्गा, कर्नाटक येथील कु. सुरभी कामत (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट चालवणारी पिढी ! कु. सुरभी कामत ही या पिढीतील एक आहे !

४.८.२०२४ (आषाढ अमावास्या) या दिवशी कु. सुरभी कामत हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने तिची आजी सौ. प्रभा कामत (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ६९ वर्षे) आणि तिचे काका श्री. गणेश कामत यांना जाणवलेली सुरभीची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. सुरभी कामत
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


 पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्मानंतर

१ अ. सुरभीचा जन्म झाल्यावर आलेली अनुभूती : ‘बाळाचा जन्म झाल्यावर तिला माझ्याकडे दिले. तेव्हा माझा नामजप आपोआप चालू झाला. जेव्हा मी तिच्याजवळ जाते, तेव्हा माझा नामजप चालू होतो.

१ आ. सुरभीचे रडणे पुष्कळ अल्प होते.’

– सौ. प्रभा कामत (कु. सुरभीची आजी, वडिलांची आई)

२. वय – २ ते ७ वर्षे

२ अ. बालसंस्कार वर्गात सांगितलेली सूत्रे लगेच कृतीत आणणे : ‘सुरभी बालसंस्कार वर्गात सांगितलेली सूत्रे लगेच कृतीत आणते. ती प्रतिदिन सकाळी उठल्यावर करदर्शन करणे, रात्री झोपतांना श्लोक म्हणणे, प्रसाद आणि महाप्रसाद घेण्यापूर्वी प्रार्थना करणे, तसेच अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना करणे इत्यादी सर्व कृती करते.

२ आ. ऐकण्याची वृत्ती असणे

१. मी सुरभीला ‘तू महाप्रसाद करत असतांना दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहू नको’, असे सांगितले. तेव्हा तिने ते लगेच ऐकले.

– श्री. गणेश कामत (मोठे काका), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. भजने ऐकण्याची आवड

‘सुरभीला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने पुष्कळ आवडतात. रात्री झोपण्यापूर्वी ती भजने लावण्यास सांगते. ‘मला झोप लागली, तरी भजने बंद करू नको’, असे ती मला सांगते.

४. गुरूंप्रती भाव

अ. सुरभीच्या स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले १ – २ वेळा आले होते. याविषयी तिने आम्हाला अत्यंत आनंदाने सांगितले.

आ. ती खेळत असतांना ‘तिचे गुरुदेवांशी अनुसंधान असते’, असे तिच्या बोलण्यावरून लक्षात येते. तिला देवाविषयी किंवा गुरुदेवांच्या संदर्भात काही सांगितल्यास तिच्या डोळ्यांतून भावाश्रू येतात.

५. कु. सुरभीचे स्वभावदोष

‘राग येणे’ आणि ‘स्वतःला महत्त्व मिळावे’, असे वाटणे.’

– सौ. प्रभा कामत (कु. सुरभीची आजी (वडिलांची आई), आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ६९ वर्षे), शिवमोग्गा, कर्नाटक. (२८.५.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक