कौशल्याने सेवा करून इतरांना आधार देणारे चि. कुशल गुरव आणि कृतज्ञताभावाने सेवा करणार्‍या चि.सौ.कां. किरण व्हटकर !

‘१७.१.२०२५ या दिवशी चि. कुशल गुरव आणि चि.सौ.कां. किरण व्हटकर यांचा शुभविवाह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत आहे. त्यानिमित्त त्यांचे नातेवाईक, संत आणि साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 


चि. कुशल गुरव आणि चि.सौ.कां. किरण व्हटकर यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! 

चि. कुशल गुरव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि. कुशल गुरव

१. श्री. आशुतोष गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. हसतमुख : ‘कुशलदादाकडे अनेक सेवांचे दायित्व आहे; मात्र त्याच्या चेहर्‍यावर कधीच ताण दिसत नाही. तो सतत हसतमुख असतो.

१ आ. प्रेमभाव : तो साधकांची पुष्कळ काळजी घेतो. तो ‘सहसाधक नियमित व्यायाम करतात ना ? वेळेवर महाप्रसाद आणि विश्रांती घेतात ना ? रुग्ण साधक औषधे घेतात ना ?’, यांविषयी विचारपूस करतो.

१ इ. समष्टी सेवाभाव 

१. तो सेवेसंबंधी प्रत्येक निर्णय संबंधित साधकांना विचारून घेतो.

२. तो आम्हाला सेवेतील अडचणी सोडवायला शिकवतो. तो सहसाधकांना वेगवेगळ्या सेवा शिकवतो आणि स्वतःही शिकत रहातो.

३. ‘त्याच्याकडे आम्हा साधकांचे दायित्व आहे, तरीही तो आमच्यातीलच एक आहे’, असे वागतो. त्याचा आम्हाला पुष्कळ आधार वाटतो.

४. कुशलदादा माझ्यासाठी एक आदर्श साधक आहे.’

२. समवेत सेवा करणारे अन्य साधक 

२ अ. ‘कुशलदादाचे राहणीमान साधे आणि नीटनेटके आहे

२ आ. जवळीक साधणे : काही वेळा अन्य ठिकाणचे युवक, मध्यमवयीन किंवा वयस्कर साधक रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी येतात. दादा त्या सर्व साधकांशी मिळून मिसळून वागतो.

२ इ. साधकांना प्रेमाने चुका सांगणे : तो साधकांना तत्त्वनिष्ठतेने चुका सांगतो. तो साधकांना चुका सांगताना ‘कुणी दुखावले जाणार नाही’, याची काळजी घेतो.

२ ई. सेवेची तळमळ

१. दादा सर्वांना साहाय्य करण्यासाठी तत्पर असतो.

२. कुशलदादा त्याच्या नावाप्रमाणेच प्रत्येक सेवा कुशलतेने करतो.

३. दादाला ‘अडचणीतून शांतपणे मार्ग कसा काढायचा ?’, हे  चांगल्या प्रकारे जमते.

४. तो अखंड सेवारत असतो. ‘दादा थकला आहे’, असे त्याच्याकडे पाहून कधीच जाणवत नाही.

५. दादाकडे अनेक सेवांचे दायित्व आहे आणि अनेक साधक दादाला सेवेनिमित्त संपर्क करतात; पण दादा जराही विचलित न होता प्रत्येक साधकाला शांतपणे अन् संयमाने उत्तर देतो.

६. दादाचा विवाह ठरल्यानंतर त्याने वैयक्तिक कामे आणि सेवा यांची चांगली सांगड घातली.

२ उ. गुरूंप्रती भाव : दादामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती भाव आणि श्रद्धा आहे.’

———-

चि.सौ.कां. किरण व्हटकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि.सौ.कां. किरण व्हटकर

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या चि.सौ.कां. किरण व्हटकर !

पू. शिवाजी वटकर

१. परिस्थिती स्वीकारणे : ‘कु. किरणताई त्यांच्या आई आणि बहीण कु. गीता यांच्या समवेत सोलापूर येथे रहात होत्या. कु. गीता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी गेल्या. तेव्हा किरण यांनी घरी राहून आईला सांभाळले. त्यांनी गीताताईंना साधना करण्यासाठी साहाय्य केले. त्यांच्या आईला पुष्कळ शारीरिक त्रास होते. त्यांच्या आई मूत्रपिंडाच्या त्रासाने गंभीर रुग्णाईत होत्या. त्या वेळी गीताताई आईच्या समवेत राहिल्या आणि किरण आश्रमात राहून साधना करत होत्या. एप्रिल २०२४ मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले. आता दोघीही आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत.

२. सेवेची तळमळ : पूर्वी किरणताई आईच्या समवेत घरी रहात होत्या. त्यांना आश्रमातील सेवेचा अनुभव नव्हता. त्या रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांना पाहुणे आणि संत यांच्याशी संबंधित सेवा मिळाली. तेव्हा किरणताईंनी ती सेवा इतरांना विचारून घेऊन शिकून घेतली आणि तळमळीने सेवा केली. त्यांनी सेवेच्या माध्यमातून गुरुदेवांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. ‘ताई त्यांना मिळालेली प्रत्येक सेवा आनंदाने स्वीकारतात आणि तळमळीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात’, असे मला वाटते.

३. ऐकण्याची वृत्ती : किरण आणि त्यांची मोठी बहीण गीता मला भ्रमणभाष करून साधनेतील काही अडचणी सांगत असतात. गुरुकृपेने मला त्या दोघींच्या साधनेच्या दृष्टीने सूत्रे सांगता येतात. तेव्हा किरणताई स्पष्टीकरण न देता मी सुचवलेले विचार स्वीकारून त्यानुसार कृती करतात.

४. भाव 

४ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती असलेला भाव : किरणताईंकडे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी संबंधित सेवा होती. तेव्हा किरणताई माझ्याकडे त्या सेवेविषयी बोलत असतांना ताईंचा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवला.

४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती असलेला भाव : एकदा किरणताईंनी मला सांगितले, ‘‘पूर्वी मला (किरण यांना) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला होता. त्या वेळी ते मला (किरण यांना) म्हणाले, ‘‘तुझा चेहरा सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्यासारखा दिसतो. तू त्यांच्यासारखी होणार !’’ किरणताई मला याविषयी सांगत असतांना मला त्यांच्यामध्ये पुष्कळ शरणागती आणि कृतज्ञताभाव जाणवला. ‘गुरुदेव प्रगती करून घेणार आहेत’, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यांच्याकडे कोणतीही सेवा आली, तरी ‘गुरुदेव करून घेणार आहेत’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे सेवा करतांना त्यांना ताण येत नाही. ‘गुरुदेव किरणताईंकडून भावपूर्ण सेवा आणि साधना करून घेत आहेत, तसेच ते किरणताईंची आध्यात्मिक प्रगतीही करून घेत आहेत’, असे मला वाटते. ताईंना गुरुदेव, संत आणि साधक यांच्याकडून साधनेसाठी पुष्कळ साहाय्य मिळते. किरणताईंचा परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या प्रती अतुट भाव आहे.

‘चि.सौ.कां. किरण आणि चि. कुशल गुरव यांचे वैवाहिक जीवन त्यांच्या साधनेला पोषक ठरो आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी त्यांच्या विवाहदिनानिमित्त मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सुकोमल चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे)

———–

सगळ्यांशी जवळीक साधणार्‍या चि.सौ.कां. किरण व्हटकर !

१. आनंदी आणि उत्साही : ‘किरण वैयक्तिक कृती करणे, नामजप करणे, भावजागृतीचे प्रयोग करणे, अन्य व्यक्तीशी बोलणे आणि सेवा इत्यादी कृती सहजतेने, उत्साहाने आणि आनंदाने करते. या तिच्या गुणांमुळे ती संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे मन सहजतेने जिंकते.

२. प्रेमभाव : किरणमध्ये असलेल्या प्रेमभावामुळे लहान मुलेही तिच्याशी लगेच जुळवून घेतात. तिला इतरांना समजून घेण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागत नाही. तिचे ‘लहान, समवयस्क, वयस्कर अशा सर्वांशी प्रेमाने बोलणे’, हे वैशिष्ट्य आहे.

३. जवळीक साधणे : किरण ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींशीही लवकर जवळीक साधते. तिने साधना करतांना तिच्यामधील ‘मनमोकळेपणा’ या गुणाचा लाभ करून घेतला. ती अल्प कालावधीत आश्रमजीवनाशी समरस झाली. तिच्या मोकळ्या स्वभावामुळे तिने केलेली सेवा साधक आणि संत यांना आवडते.

४. आध्यात्मिक मैत्रीण : किरणला साधना करत असतांना ‘देवच आपला खरा मित्र आहे’, असे वाटते. ती माझ्यापेक्षा लहान असूनही घरातील कठीण प्रसंगांत ती मला आधार देते. आता आम्ही दोघीही आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहोत आणि ती मला साधनेत साहाय्य करत आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला किरणच्या रूपात आध्यात्मिक मैत्रीण दिली आहे.

५. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : किरण आरंभापासूनच ध्येय घेऊन व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करत आहे. ती साधनेचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सकारात्मक राहून तळमळीने प्रयत्न करते. ती व्यष्टी साधनेच्या अंतर्गत सर्व सूत्रे प्रामाणिकपणे पूर्ण करते.

६. सेवेची तळमळ : मागील ६ वर्षांपासून किरण रामनाथी आश्रमात येणारे अतिथी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि संत यांना प्रसाद-महाप्रसाद वाढण्याची सेवा करत आहे. ‘अतिथी आणि संत यांच्या रूपाने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवच आले आहेत’, असा किरणचा भाव असतो. ती सांगितलेली सेवा समयमर्यादेत आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती तळमळीने सेवा करत असल्याने तिला सेवेतील आनंद मिळतो.

७. कृतज्ञताभाव : किरणला तिच्या जीवनात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव असल्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटते. तिला ‘संतांप्रती किती कृतज्ञ राहू !’, असे वाटत असते.’

– कु. गीता व्हटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

उखाणे

  •  ब्रह्मा, विष्णु, महेश सती अनसूयेच्या उदरी जन्मले ।
    —रावांच्या रूपात मला प्रत्यक्ष प्रभु श्रीरामच भेटले ।।
  •  जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सुटण्यासाठी साधना महत्त्वाची ।
    साधना करायला मिळावी, म्हणून निवड केली …ची ।।

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १४.१२.२०२४)