‘१९.१२.२०२४ या दिवशी आघारी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील प्रभाकर धोंडू काष्टे (वय ६६ वर्षे) यांचे कळंबोली, तालुका पनवेल येथे निधन झाले. साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. कु. सिद्धि गुजराथी, दाभोळ, ता. दापोली.
१ अ. ‘काष्टेकाका नेहमी हसतमुख आणि आनंदी असत.
१ आ. मनमोकळेपणा : काकांच्या बोलण्यात सहजता जाणवायची. ते मोकळेपणाने बोलायचे.
१ इ. सेवेची तळमळ : काकांना घरातील व्यक्तींकडून साधनेला विरोध होता, तरीही ते सेवा तत्परतेने आणि तळमळीने करत असत.
१ ई. गुरूंप्रती भाव : ते मला सांगायचे, ‘‘प.पू. (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्याला ‘सेवा, साधना, स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन’ यांविषयी सांगतात. त्यानुसार केल्याने आपल्याला प्रारब्धभोग भोगण्यासाठी शक्ती मिळणार आहे. आपण निमित्तमात्र असून प.पू.च सर्वकाही करतात.’’
२. सौ. प्रार्थना परेश गुजराथी, दाभोळ, दापोली.
२ अ. प्रेमभाव : ‘काष्टेकाकांचा स्वभाव प्रेमळ होता. ते नवख्या व्यक्तीलाही आपलेसे करत असत. ते सगळ्यांशी प्रेमाने बोलत.
२ आ. सहनशील : काका कुणाशीही वादविवाद करत नसत. ते नेहमी न्यूनता स्वीकारत असत. त्यांच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती त्यांच्यावर चिडली, तरीही काका सर्व शांतपणे ऐकून घेत असत.
२ इ. साधकांशी जवळीक असणे : आमच्या घरात कधी वाद झाला, तर मी वडिलांशी बोलतो, तसे काकांशी बोलत असे. मला काकांचा नेहमी आधार वाटत असे. काका आम्हा सगळ्यांपेक्षा वयाने मोठे होते, तरीही ते आमचे म्हणणे सहजतेने ऐकत असत.
२ ई. काकांना ‘चहा पिणे योग्य नाही’, असे समजल्यापासून त्यांनी चहा पिणे बंद केले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २२.१२.२०२४)
३. श्री. सूरज चव्हाण, वणौशी, दाभोळ.
३ अ. आयुर्वेदानुसार आचरण करणे : ‘काकांचा आयुर्वेदावर विश्वास होता. ते शास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी लवकर जेवत असत. ते स्वतः केवळ आयुर्वेदीय औषधे घ्यायचे आणि आम्हालाही आवश्यकतेनुसार काढा बनवून द्यायचे.
३ आ. धर्माभिमानी : काका समाजातील मुलांचे ‘त्यांनी त्यांच्या आईला ‘मम्मी’ म्हणण्याऐवजी ‘आई’ म्हणावे’, यासाठी प्रबोधन करत असत.
३ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचनाची आवड : काका दैनिक ‘सनातन प्रभात’ पूर्ण वाचून झाल्यावरच झोपत असत.
३ ई. सेवेची तळमळ : ‘समाजातील लोकांनीही दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचावे’, यासाठी काका प्रयत्न करत असत. कधी सहसाधक समवेत नसल्यास काका एकटेच जाऊन नियोजनाप्रमाणे सेवा पूर्ण करायचे. ते धर्मशिक्षणवर्ग चालू होण्यासाठी प्रयत्न करत असत.
३ उ. काकांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. काकांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचा चेहरा प्रसन्न आणि तेजस्वी दिसत होता.
२. तेव्हा वातावरणात दाब जाणवत नव्हता.’
४. श्री. परेश गुजराथी, दाभोळ
४ अ. ‘काका सकाळी आणि संध्याकाळी नियमित नामजप करत असत.
४ आ. काकांना ‘हिंदु धर्माचा प्रसार व्हावा आणि हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, अशी तळमळ होती.
४ इ. सेवेची तळमळ : त्यांनी दाभोळ विभागात अन्य साधकांच्या साहाय्याने सनातन संस्थेचे कार्य चालू केले. त्यांनी कसलीही सवलत न घेता राष्ट्रीय आंदोलने, हिंदु राष्ट्र-जागृती सभा यांवेळी झोकून देऊन सेवा केली.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २२.१२.२०२४)