१ सप्टेंबर या दिवशी सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार ! – उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याचा निषेध !

मुंबई – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ १ सप्टेंबर या दिवशी दुपारी १ वाजता महायुती सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार आहोत. हुतात्मा स्मारकाला वंदन करून ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आंदोलन केले जाईल, अशी माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘मातोश्री’वर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष या आंदोलनात सहभागी होणार आहेत.