कर्नाटकात भाजपचे काँग्रेसला प्रत्युत्तर !
तीर्थहळ्ळी (कर्नाटक) – तुम्ही टीपू सुलतानची जयंती साजरी करा, आम्ही वरमहालक्ष्मी सण साजरा करू. तुम्ही वरमहालक्ष्मी सण साजरा करून दाखवा, तो तुम्ही कधीही करणार नाही; कारण तुम्हाला मतांची भीती आहे, असे विधान भाजपचे नेते अरग ज्ञानेंद्र यांनी काँग्रेसच्या विरोधात बोलतांना केले. ते येथील सुवर्ण सहकार भवनात वरमहालक्ष्मी सणानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
अरग ज्ञानेंद्र पुढे म्हणाले की, भारतीय परंपरा क्षीण झाली, तरच भारत २ तुकड्यांत विभागला जाईल. जिथे भारतीय परंपरा आणि संस्कृती टिकून आहे, तिथे सर्व काही चांगले आहे; पण आपल्या मुली जेव्हा संस्कृती आणि परंपरा विसरू लागतील, तेव्हा आपला देश नाश पावेल.