पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे आवाहन
छतरपूर (मध्यप्रदेश) – आता आपण सर्व जण आपल्या नावापुढे जात लावतो. कुणी ब्राह्मण, कुणी ठाकूर, कुणी वैश्य, तर कुणी शूद्र. जर आपण आपल्या नावापुढे ‘हिंदु’(Hindu) लावले, तर इतर देशांतून येणारे लोक आपल्याला हिंदु धर्माच्या नावाने ओळखतील, असे आवाहन येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री(Pandit Dhirendrakrishna Shastri) यांनी केले आहे.
‘करो या मरो’ची स्थिती
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, भारतात जातीवादाचे संकट खूप वाढले आहे. ‘करो या मरो’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताला उच्च स्थानी न्यायचे असेल, तर भारतातून जातीवाद संपवावा लागेल.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या वेळी ‘छतरपूर ते ओरछा अशी हिंदू एकता पदयात्रा काढण्यात येणार असून त्यात सहभागी होण्यासाठी भ्रमणभाषद्वारे नोंदणी केली जाणार’, अशी घोषणा केली. हिंदु समाजाला जोडणे हा यात्रेचा उद्देश आहे. याद्वारे परदेशातून येणारे लोक हिंदु समाजातील लोकांना ओळखू शकतात आणि भेटू शकतात, असेही ते म्हणाले.