सद्गुरूंना जाणण्यासाठी बुद्धी, मन यांचा उपयोग नाही, तेथे आंतरिक निष्ठाच पाहिजे…

१.अभिषेक

ज्या वेळी परमात्मशक्तीचा विचार दृढ होतो, देहभावाच्या पलीकडे जातो, देवभाव दृढ होतो, शरिरातील ६ चक्रे ईश्वरभावनेने भरून जातात, ब्रह्मरंध्राचा प्रवास होऊन सहस्रदलाशी स्थिर होतो, तेव्हा शरिरात भक्तीरस पाझरू लागतो, तो ‘अभिषेक’ होय.

२. एकांत

देहभावाशी निगडित झालेल्या ‘मी’चा जेव्हा अंत होतो, चित्तशुद्धी झाल्यावर खोट्या ‘मी’चा अंत आणि खर्‍या ‘मी’चा जन्म होतो, तोच ‘एकांत’ होय. आंतरिक निष्ठा संपन्न होण्यासाठी एकांत आवश्यक आहे. सद्गुरूंना जाणण्यासाठी बुद्धी, मन यांचा उपयोग नाही, तेथे आंतरिक निष्ठाच पाहिजे.

– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)