DW News Downplays Attacks On Hindus : जर्मनीतील वृत्तवाहिनीकडून बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांना खोटे ठरवण्‍याचा प्रयत्न !

‘आक्रमणे धार्मिक नाहीत, तर राजकीय हेतूने प्रेरित’ असल्‍याचा दावा !

नवी देहली – बांगलादेशामध्‍ये हिंदूंवर, त्‍यांच्‍या मंदिरांवर आक्रमणे होत असतांना पाश्‍चात्त्य आणि साम्‍यवादी प्रसारमाध्‍यमे जिहादी मुसलमानांची बाजू घेत हिंदूंवरील अत्‍याचारांना खोटे ठरवण्‍याचा प्रयत्न करत आहेत. जर्मनीतील वृत्तवाहिनी ‘डायचे वेले’ हिने १९ ऑगस्‍ट या दिवशी एक व्‍हिडिओ प्रसारित केला. व्‍हिडिओमध्‍ये बांगलादेशातील हिंदूंवर होणारी आक्रमणे दडपण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला आणि भारतीय प्रसारमाध्‍यमांवर खोटी माहिती पसरवल्‍याचा आरोप करण्‍यात आला. तसेच हिंदूंवरील आक्रमणांमागील कारण धार्मिक नसून राजकीय असल्‍याचा दावा केला आहे. हा व्‍हिडिओ २ मिनिटे २९ सेकंदांचा आहे.

काय आहे ‘डायचे वेले’च्‍या व्‍हिडिओमध्‍ये ?

१. या व्‍हिडिओमध्‍ये बांगलादेशातील जेसोर येथील हजरत गरीब शाह मजार शरीफवरील जाळपोळ करण्‍याचा उल्लेख केला आहे, जो हिंदु मंदिरावरील आक्रमण म्‍हणून सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाला होता, असे म्‍हटले आहे. या व्‍हिडिओमध्‍ये, ‘बांगलादेशात एक हिंदु मंदिर जळत आहे’, असे सांगितले जात असले, तरी ही घटना खोटी आहे. बांगलादेशातील आंदोलनात कथितरित्‍या जाळण्‍यात आलेल्‍या हिंदु मंदिरांचे किंवा घरांचे व्‍हिडिओ आहेत. अशी आक्रमणे येथे होत आहेत; परंतु सर्वच खरी नाहीत.

२. या व्‍हिडिओमध्‍ये थॉमस कीन नावाच्‍या या तज्ञाने दावा केला की, ही आक्रमणे धार्मिक कारणावरून झाली आहेत कि नाही ? हे स्‍पष्‍ट नाही. ही आक्रमणे धार्मिक हेतूने प्रेरित असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे; परंतु तसे नाही.

३. हिंदूंवरील आक्रमणांमागे धार्मिक ऐवजी राजकीय कारण आहे. याचे कारण शेख हसीना यांना हिंदूंचे रक्षणकर्ते म्‍हणून पाहिले जात होते, असे यात म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

जर्मनीतील अशी प्रसारमाध्‍यमे नाझी मनोवृत्तीची आहेत, असेच म्‍हणायला हवे ! जगभरातील हिंदूंनी याचा जाब विचारला पाहिजे !