पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टपासून युक्रेन दौर्यावर !
मॉस्को (रशिया) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्व युरोपच्या दौर्यावर गेले आहेत. २१ आणि २२ ऑगस्ट या दिवशी ते पोलंडमध्ये असतील, तर २३ ऑगस्टला पंतप्रधान युक्रेनमध्ये जातील. ४५ वर्षांनंतर प्रथमच भारताचा पंतप्रधान युक्रेनचा दौरा करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्याच्या २ दिवस आधीच युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचे सर्वांत मोठे ड्रोन आक्रमण केले आहे, अशी रशियाची राजधानी मॉस्को शहराचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी दिली.
Ukraine targets Moscow with “one of the largest” drone attacks; Russian air defence units destroyed at least 10 drones flying towards the capital.
PM Modi is on a visit to Poland and will visit Ukraine on August 23rd#Russia #Warsaw #WorldNews pic.twitter.com/Z4lIZgRNVQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 21, 2024
रशियाच्या वायूदलाने मॉस्कोच्या दिशेने येणारे १० ड्रोन नष्ट केले. पोडॉल्स्क शहरावरही डागलेले काही ड्रोन नष्ट करण्यात आले, असे सोबयानिन म्हणाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या ड्रोन आक्रमणानंतरचे हे सर्वांत मोठे आक्रमण आहे. मे २०२३ मध्ये मॉस्कोमध्ये ८ ड्रोन नष्ट करण्यात आले होते.