‘पुणे व्यापारी महासंघा’ची मागणी
पुणे – व्यापार्यांनी भरलेल्या कराची रक्कम राज्याच्या विकासकामांमध्ये न वापरता ती ‘माझी लाडकी बहीण’ आणि ‘माझा लाडका भाऊ’ या योजनांद्वारे विनामूल्य रक्कम वाटली जात आहे. व्यापारी वर्गाने मेहनत करून जमा केलेल्या कराच्या रकमेतून व्यापार्यांसाठी ‘लाडके व्यापारी’ योजना चालू करावी, अशी मागणी ‘पुणे व्यापारी महासंघा’कडून करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पाठवण्यात आले आहे. व्यापारी वर्ग नियमितपणे सरकारकडे कर भरत असतो. कर भरतांनाही त्याला अनेक किचकट गोष्टींना सामोरे जावे लागते. तो कर भरण्यासाठीच्या व्यवस्थेसाठी बराच पैसा व्यय करावा लागतो. व्यापारी वर्गाने जमा केलेल्या कररूपी पैशांतून व्यापार्यांसाठी ‘लाडके व्यापारी’ ही योजना चालू करावी.