Bangladesh Police : बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारच्‍या आश्‍वासनावर पोलिसांनी संप घेतला मागे !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील पोलिसांनी संप पुकारला होता. जिवाला धोका असल्‍याचे सांगत त्‍यांनी कामावर येण्‍यास नकार दिला होता. आता पोलिसांनी संप मागे घेण्‍याचे मान्‍य केले आहे. अंतरिम सरकारने पोलिसांच्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍याचे आश्‍वासन दिल्‍याने त्‍यांनी संप मागे घेण्‍याचे मान्‍य केले आहे.

‘ढाका ट्रिब्‍युन’ वृत्तपत्राने दिलेल्‍या वृत्तानुसार संप करणार्‍या कामगारांच्‍या प्रतिनिधींनी ११ ऑगस्‍ट या दिवशी गृह खात्‍याचे सल्लागार ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम्. सखावत हुसैन यांच्‍यासोबत बैठक घेतली. त्‍यांच्‍या ११ कलमी सूचीमध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या बहुतांश मागण्‍या पूर्ण केल्‍या जातील, असे आश्‍वासन पोलिसांना देण्‍यात आले आहे. त्‍यानंतर पोलीस कर्मचार्‍यांनी गणवेश परिधान करून संप मागे घेण्‍याची घोषणा केली.