Sajeeb Wazed Joy : भारताने जगामध्‍ये नेतृत्‍वाची भूमिका बजावणे आवश्‍यक !

शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांचे मोदी सरकारला आवाहन !

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना व त्यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय (डावीकडे) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (उजवीकडे)

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – बांगलादेशातील प्रचंड गोंधळाच्‍या पार्श्‍वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आहेत. शेख हसीना यांचा अमेरिकेत वास्‍तव्‍य करणारा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी भारताचे विशेष आभार मानले आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्‍टन डीसी येथून एक व्‍हिडिओ प्रसारित करतांना सजीब वाझेद जॉय म्‍हणाले की, माझ्‍या आईचे (शेख हसीना) प्राण वाचवण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सरकारने केलेल्‍या तत्‍पर कारवाईसाठी मी त्‍यांचे वैयक्‍तिकरित्‍या आभारी आहे. मी त्‍यांचा सदैव ऋणी राहीन. माझा दुसरा संदेश असा आहे की, भारताने जगामध्‍ये नेतृत्‍वाची भूमिका बजावली पाहिजे आणि त्‍याने इतर परकीय शक्‍तींना परिस्‍थिती नियंत्रित करण्‍याची संधी देऊ नये.

संपादकीय भूमिका

भारताने जगाऐवजी प्रथम हिंदूंचे नेतृत्‍व करावे आणि त्‍यांचे रक्षण करावे !