पुणे येथे आमीष दाखवून धर्मांधांनी केली १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक !

पुणे – ‘साद मोटर्स’ या गाड्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक केल्यास महिना २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्या माध्यमातून ९ जणांची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी रफिक खान, सनोबर उपाख्य सौदा खान, इसा खान आणि मौलाना उपाख्य अब्दुल उपाख्य मिफताही खान यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक) या प्रकरणी निसार शेख यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.

आरोपीचे मिठानगर येथे ‘साद मोटर्स’ या नावाने गाड्यांचे खरेदी-विक्रीचे दुकान आहे. ‘गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देऊ’, असे सांगून ९ जणांकडून पैसे घेतले. गेल्या ४ वर्षांमध्ये आरोपींनी परतावा, तसेच मुद्दलही परत दिली नाही; म्हणून गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली.