मुंबई – उरण (रायगड) येथे यशश्री शिंदे हिची केलेली हत्या आणि लव्ह जिहाद यांच्या निषेधार्थ कांजूर-भांडुप येथील स्थानिक रहिवाशांनी १ ऑगस्ट या दिवशी बंदचे आवाहन केले होते. रिक्शाचालक, दुकानदार, भाजीवाले, स्थानिक मित्रमंडळे, गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, सामाजिक-धार्मिक संस्था आदींनी सहभाग घेऊन हा बंद १०० टक्के यशस्वी केला. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन यशश्री शिंदे हिला श्रद्धांजली वाहिली.