Haridwar Liquor Seized : हरिद्वार येथे कावड मेळ्‍याच्‍या परिसरात अवैध दारूचा साठा जप्‍त !

अवैध दारूच्या साठ्यासह आरोपी

हरिद्वार – हरिद्वारमध्‍ये (Haridwar) भरणार्‍या कावड मेळ्‍याला देशाच्‍या विविध भागांतून लोक येतात. गंगाजल भरल्‍यानंतर हे भाविक त्‍यांच्‍या कावड यात्रेला (Kanwar Yatra) निघतात. हरिद्वारमधील ‘हर की पैडी’ हे कोरडे क्षेत्र घोषित करण्‍यात आले आहे. म्‍हणजे इथे दारूबंदी आहे. अशा स्‍थितीत काही समाजकंटक कावड मेळ्‍यात दारूचा पुरवठा करतात. अशाच एका टोळीला हरिद्वार पोलिसांनी ‘हर की पैडी’ परिसरात पकडले असून, त्‍यांच्‍याकडील अवैध दारूचा मोठा साठा जप्‍त करण्‍यात आला आहे. (काही समाजकंटक कावड मेळासारख्‍या पवित्र ठिकाणी दारूचा पुरवठा करून कावड यात्रेतील सात्त्विकता नष्‍ट करू पहातात आणि  हिंदूंच्‍या उत्‍सवात विघ्‍ने आणण्‍याचा प्रयत्न करतात. अशा समाजकंटकापासून हिंदूंनी सावध रहावे ! – संपादक)

या टोळीतील लोक कावड मेळ्‍याच्‍या गजबजलेल्‍या ठिकाणी अवैध दारू विक्री करत होते. हरिद्वारमधील ‘हर की पैडी’ परिसर हा कोरडा परिसर घोषित करण्‍यात आला असूनही येथे वेळोवेळी अवैध दारू पकडली जाते. हरिद्वारमध्‍ये कावड मेळा चालू असून तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.