इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला गुरुपादुकांच्या पालखीद्वारे प्रारंभ

प.पू. भक्तराज महाराज

इंदूर (मध्यप्रदेश) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु, तसेच सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला २० जुलैपासून प्रारंभ झाला. २० जुलैला सकाळी ९.३० वाजता येथील भक्तवात्सल्याश्रमातून गुरुपादुकांची पालखी काढण्यात आली. या पालखीत प.पू. अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. ही पालखी आश्रमातून येथील दत्तमंदिरात गेली. तेथून ती अन्नपूर्णा मार्गावरील नवनीत गार्डन येथील गुरुपौर्णिमेच्या स्थळी नेण्यात आली. पालखी येथे पोचल्यावर स्तवन मंजिरी म्हणण्यात आली.

प.पू. अनंतानंद साईश यांच्या पादुका ( डावीकडे), प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुका (मध्यभागी) , प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुका (उजवीकडे)

या वेळी ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवम् परमार्थिक सेवा ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, उपाध्यक्ष श्री. भवरास्कर, खजिनदार श्री. विजय मेंढे, तसेच डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्यासह २०० हून अधिक भाविक उपस्थित होते. २१ जुलै या दिवशी नवनीत गार्डन येथे गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.