Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात सत्ताधारी अवामी लीगच्‍या इस्‍लामी कट्टरवाद्यांकडून हिंदूंवर आक्रमण : ६० घायाळ

ढाका – येथे अवामी लिगच्‍या इस्‍लामी कट्टरतावाद्यांनी हिंदूंवर केलेल्‍या आक्रमणात ६० हिंदू घायाळ झाले आहेत. या आक्रमणात हिंदूंची घरे पाडण्‍यात आली आणि मंदिरालाही लक्ष्य करण्‍यात आले.

१. याविषयी मिळालेल्‍या माहितीनुसार १० जुलै २०२४ या दिवशी स्‍थानिक नगरसेवक महंमद औवाल हुसैन आणि त्‍याचे समर्थक यांनी अल्‍पसंख्‍य हिंदू वास्‍तव्‍य करत असलेल्‍या मिरंजिला कॉलनीवर आक्रमण केले.

२. या वेळी इस्‍लामी कट्टरवाद्यांनी जोरदार दगडफेक केली आणि घरांवर आक्रमण करून ती उद़्‍ध्‍वस्‍त केली. या वेळी मंदिरालाही लक्ष्य करण्‍यात आले.

३. घायाळ झालेल्‍या हिंदूंना ढाका वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

४. बांगलादेशमध्‍ये हिंदूंवर आक्रमण होणे सामान्‍य झाले आहे. या वर्षाच्‍या प्रारंभी  जानेवारी महिन्‍यात बांगलादेशच्‍या निवडणुकीनंतर अनेक हिंदूंना त्‍यांची घरे सोडावी लागली होती. त्‍यांची घरे जाळण्‍यात आली होती आणि लुटली गेली होती.

संपादकीय भूमिका

  • सत्ताधारी अवामी लीगच्‍या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध आहेत. असे असतांनाही केंद्र सरकार तेथील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी शेख हसीना यांच्‍यावर दबाव का आणत नाहीत ?
  • बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे कट्टरतावादीच हिंदूंवर अन्‍याय करत असतील, तर तेथील हिंदूंची स्‍थिती किती दयनीय असेल, याचा विचारही न केलेला बरा !