पुणे येथील सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्याकडून सौ. अर्चना चांदोरकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. प्रेमभाव

‘मागील २ वर्षांमध्ये मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत असून मनात अयोग्य विचार येत होते. तेव्हा प्रत्येक वेळी मी पू. (सौ.) मनीषाताईंना मनातील सर्व विचार सांगायचे. पू. ताईंच्या प्रीतीमुळेच त्या मला समजून घ्यायच्या. त्या वेळी मला पुष्कळ हलकेपणा जाणवायचा आणि मला कृतज्ञता वाटायची.

सौ. अर्चना चांदोरकर

२. साधनेत साहाय्य करणे

माझ्या शारीरिक त्रासांमुळे काही वेळा माझे मन अस्थिर व्हायचे. तेव्हा मी पू. ताईंना मनातील विचार सांगायचे. पू. ताईंची पुष्कळ व्यस्तता असूनही त्या माझे म्हणणे शांतपणे आणि मनापासून ऐकून घ्यायच्या. तेव्हा पू. ताई मला प्रोत्साहन आणि धीर द्यायच्या. माझे शस्त्रकर्म होण्याआधी आणि झाल्यावरही मी जेव्हा त्यांच्याशी साधनेच्या प्रयत्नांच्या संदर्भात बोलायचे, तेव्हा प्रत्येक वेळी ‘तू प्रयत्न करतच आहेस’, असे सांगून त्या मला प्रोत्साहन द्यायच्या आणि काही वेगळे प्रयत्न सांगून साधनेला दिशाही द्यायच्या. पू. ताईंनी मला दिलेला आधार आणि चैतन्य यांमुळे मी साधना करू शकत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आम्हाला पू. (सौ.) मनीषाताईरूपी संतांचा सहवास आणि सत्संग दिला. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. अर्चना चांदोरकर, बिबवेवाडी, पुणे. (७.३.२०२४)


पू. मनीषाताई गुरुदेवांचे रूप असती ।

पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या ४१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने साधिकेने त्यांना पुढील कवितारूपी शुभेच्छापत्र दिले होते.

अर्पितो ओंजळ कृतज्ञतापुष्पांची ।
पू. मनीषाताईरूपी संतरत्न दिले आम्हास तुम्ही ।। १ ।।

पू. मनीषाताई गुरुदेवांचे रूप असती ।
साधकांवर चैतन्याचा वर्षाव अन् अपार प्रीती करिती ।। २ ।।

गुरुदेवांना अपेक्षित असे घडावे सर्व साधकांनी ।
हाच निरंतर ध्यास असे पू. मनीषाताईंच्या मनी ।। ३ ।।

करूनी आचरण पू. मनीषाताईंसारखे, सदैव त्यांचा आदर्श ठेवूनी ।
ईश्वरप्राप्तीचा ध्यास घेऊनी व्हावे पू. मनीषाताईसम आम्ही ।। ४ ।।

स्वभावदोष-अहंरूपी डोंगर पार करूनी भावभक्तीचे बीज पेरूनी ।
बहरू दे भक्ती साधकांच्या अंतरी ।। ५ ।।

घडावे आम्ही सर्व जिवांनी पू. मनीषाताईंचा लाभ करून घेऊनी । हीच असेल कृतज्ञता खरी पू. मनीषाताईंच्या चरणी ।। ६ ।।

– सौ. अर्चना चांदोरकर, बिबवेवाडी, पुणे. (७.३.२०२४)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.