चीन त्याच्या नागरिकांमध्ये पसरवत आहे खलिस्तानविषयीची खोटी माहिती !

चिनी नागरिकांचा लोकशाहीऐवजी हुकूमशाहीवर विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न

नवी देहली – चीन भारताला तोडण्याच्या कटाचा एक भाग म्हणून भारतविरोधी खलिस्तानी आतंकवादी संघटनांना साहाय्य करत आहे. चीनची गुप्तचर संस्था आता चिनी नागरिकांना ‘खलिस्तान’विषयी माहिती देत आहे.

१. चीनची सामाजिक माध्यमे ‘विबो’ आणि ‘बिलिबिली’ यांवर खलिस्तानविषयीची माहिती प्रसारित केली जात आहे. यात अमेरिका आणि ब्रिटन येथे खलिस्तानी समर्थकांनी अन् त्यांच्या संघटनांनी आयोजित केलेल्या फेरीविषयी चिनी भाषेत माहिती दिली जात आहे. याखेरीज या फेर्‍यांचे व्हिडिओही प्रसारित केले जात आहेत. त्याद्वारे ‘भारतातील शीख अप्रसन्न असून ते स्वतंत्र खलिस्तानची मागणी करत आहेत’, असे पसरवले जात आहे.

२. ज्या सामाजिक माध्यमांतील ज्या खात्यांवरून खलिस्तानविषयी प्रसार केला जात आहे, त्यांचे ७० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ही सर्व खाती चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी जोडलेली आहेत. गुप्तचर यंत्रणा जाणीवपूर्वक चिनी नागरिकांना भारताविषयी खलिस्तानच्या संदर्भात खोटा प्रचार करत आहे. केवळ सामाजिक माध्यमेच नाही, तर तेथील राष्ट्रीय दूरचित्रवाहिन्या आणि वर्तमानपत्रे यांतूनही भारताविरुद्ध चिनी भाषेत खलिस्तानविषयी प्रचार करत आहेत.

३. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ आणि खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’देखील चीनच्या गुप्तचर यंत्रणेला यासंदर्भात साहाय्य करत आहे.

४. चीनची गुप्तचर संस्था खलिस्तानचा हा खोटा प्रचार देशातील लोकांना खोट्या राष्ट्रवादासाठी शिकवत आहे, जेणेकरून त्याच्या देशातील लोक शेजारी देश भारत आणि तेथील लोकशाही कमकुवत मानतील. यामुळे चीनची व्यवस्था घसरत चाललेली असतांनाही आणि त्याच्याविषयी जागतिक अविश्‍वासार्हता असतांनाही चीनच्या हुकूमशाही व्यवस्थेवर चिनी लोकांचा विश्‍वास अबाधित राहील.

संपादकीय भूमिका 

डावपेचात हुशार असणारे भारताचे शत्रू देश !