जोधपूर (राजस्‍थान) येथे मुसलमानांकडून हिंसाचार : पेट्रोल बाँबचा वापर

मशिदीच्‍या बेकायदेशीर बांधकामाला हिंदूंनी केला होता विरोध

धर्मांधांनी केलेल्या दंगलीचे फोटो

जोधपूर (राजस्‍थान) – शहरातील सूरसागर परिसरात शुक्रवार म्‍हणजे २१ जूनच्‍या रात्री १० वाजता ईदगाह मशिदीचे बेकायदेशीर बांधकाम हटवण्‍यावरून वाद चालू झाला. मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक केली. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार त्‍या वेळी पेट्रोल बाँबचाही वापर करण्‍यात आला. त्‍यानंतर जाळपोळ आणि दगडफेक चालू झाली. घटनास्‍थळी पोचलेल्‍या पोलिसांवरही दगडफेक करण्‍यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक नितीन दवे घायाळ झाले. (पोलिसांवरही दगडफेक करण्‍यास धजावणारे धर्मांध ! – संपादक) या प्रकरणी पोलिसांनी ४२ जणांना कह्यात घेतले आहे.

धर्मांधांनी केलेल्या दंगलीचे फोटो

मशिदीच्‍या परिसरात बेकायदेशीर बांधकाम

ईदगाह मशिदीच्‍या परिसरातील भूमी वादग्रस्‍त आहे. या भूमीवर मुसलमानांकडून वादग्रस्‍त बांधकाम केले गेले. १५ वर्षांपूर्वी येथील हिंदु आणि मुसलमान समाजामध्‍ये करार झाला होता. या करारानुसार या भूमीवर कोणतेही बांधकाम केले जाणार नाही, असे दोन्‍ही सामाजाने मान्‍य केले होते; मात्र मुसलमानांनी हा करार धाब्‍यावर बसवून येथे बेकायदेशीरपणे प्रवेशद्वार बांधण्‍याचे काम चालू केले. हिंदूंनी या बांधकामाला विरोध केला आणि प्रवेशद्वार उखडून टाकले.

मुसलमानांचा जमाव हिंसक

२१ जूनला जशी रात्र सरत गेली, तसा मुसलमानांचा जमाव हिंसक होत गेला. परिसरात दगडफेक करण्‍यात आली. त्‍यानंतर पोलिसांनी काही घरांची झडती घेतली. त्‍यामध्‍ये १५-२० तरुणांना कह्यात घेतले. साधारण ९.३० वाजता पोलिसांनी दोन्‍ही समूदायातील प्रतिनिधींना एकत्र बोलावले. दोघांनाही शांतता राखण्‍याचे आवाहन करण्‍यात आले. त्‍यानंतर रात्री १०.१५ वाजता मुसलमानांनी पुन्‍हा दगडफेक करण्‍यास आरंभ केला. त्‍यानंतर हिंदूंनीही दगडफेक करण्‍यास आरंभ केला. त्‍यानंतर एका मुसलमानाच्‍या दुकानाला आग लावण्‍यात आली.

संपादकीय भूमिका

भारतभरात हिंसाचाराला धर्मांध मुसलमान कारणीभूत असतात, हे लक्षात घ्‍या ! भारतभरात बेकायदेशीर बांधकाम करून भूमी बळकावण्‍याचा मुसलमानांच्‍या भूमी जिहादला सुरक्षायंत्रणा कशी आळा घालणार ?