आचारधर्म सर्वश्रेष्ठ

सर्व शास्त्रांत आचार श्रेष्ठ सांगितला आहे. धर्म आचारातून निर्माण होतो. धर्माच्या आचरणाने आयुष्य वाढते. कौरव-पांडव लहानपणी द्रोणाचार्यांच्या आश्रमात शिकायला गेले. पहिल्या दिवशी द्रोणाचार्यांनी पाठ दिला, ‘सत्यं वद ।’ आणि सांगितले, ‘उद्या हे पाठ करून या.’ दुसर्‍या दिवशी सर्वांनी पाठ म्हणून दाखवले. कौरवांचे तर लगेच पाठ झाले; कारण लबाडांना धर्म लवकर पाठ होतो. एकटा धर्मराजा म्हणाला, ‘गुरुदेव, ‘सत्यं वद’ हे जोपर्यंत माझ्या आचरणात येत नाही, तोपर्यंत ते पाठ झाले असे म्हणणे व्यर्थ नाही का ?’ धर्माची तत्त्वे आचरणात असावी लागतात.