Chinese PM Congratulates Modi : (म्हणे) ‘चीन भारतासमवेत काम करण्यास सिद्ध !’ – चीनचे पंतप्रधान ली कियांग

चीनच्या पंतप्रधानांनी ८ दिवसांनी केले पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन !

चीनचे पंतप्रधान ली कियांग

बीजिंग (चीन) – चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी निवडणुकीच्या निकालानंतर ८ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे. कियांग यांनी संदेशात म्हटले की, चीन-भारत संबंधांचा सशक्त आणि स्थिर विकास केवळ दोन्ही देशांच्या कल्याणासाठीच आवश्यक नाही, तर संपूर्ण प्रदेश अन् जगात स्थिरता आणण्यासाठीही आवश्यक आहे.

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध योग्य दिशेने नेण्यासाठी चीन भारतासमवेत काम करण्यास सिद्ध आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांसाठीही हा योग्य निर्णय असेल.

संपादकीय भूमिका

चीनला खरोखरच भारतासमवेत काम करायचे असते, तर त्याने भारताच्या विरोधात कारवाया केल्या नसत्या. त्यामुळे धोकेबाज चीनसमवेत भारत कदापि काम करू शकत नाही !