‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे’. शरीर आरोग्यसंपन्न असल्यास साधनेत शारीरिक अडचणी येत नाहीत. शरीर सात्त्विक ठेवल्यास साधनेत शीघ्रतेने प्रगती होते. ‘शरीर सात्त्विक कसे ठेवायचे ?’, ते ॲलोपॅथी नव्हे, तर आयुर्वेद शिकवतो.
‘हिंदु राष्ट्रात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय येथे ‘आयुर्वेद’ हा विषय लहानपणापासून शिकवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना लहानपणापासूनच आरोग्याविषयी माहिती ज्ञात होऊन ते रोगराईपासून दूर रहातील.’
आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून व्यायाम करावा !
‘म्हातारपणी सांधे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी आजार झाले की, आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्यायाम, योगासने इत्यादी करायला सांगतात. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले