
वयाच्या केवळ २० व्या वर्षी पेशवाईची वस्त्रे स्वीकारल्यावर बाजीरावांनी निजाम, इंग्रज, सिद्दी, मोगल आदी हिंदु राष्ट्राच्या शत्रूंवर वचक बसवला. २० वर्षांच्या सत्ताकाळात रणधुरंधर बाजीरावांनी २१ मोठ्या लढाया केल्या. यांपैकी एकही लढाई ते हरले नाहीत ! वर्ष १७३९ मध्ये इराणच्या नादिरशहाने देहलीवर आक्रमण केले. त्याचे पारिपत्य करण्यास बाजीराव सैन्यासह निघाले. हे कळताच नादिरशहा पळून गेला. हिंदू येत आहेत, हे कळल्यावर वायव्येकडून आलेला आक्रमक पळून जाण्याची ही पहिलीच वेळ ! बाजीरावांनी देहलीपर्यंत दिलेल्या धडकेने घाबरून जाऊन मोगल बादशहाने काशी आणि मथुरा ही तीर्थक्षेत्रे मुक्त केली.
(‘मुळावरच घाव घातला की, फांद्या आपोआप खाली येतात’, हे थोरल्या बाजीरावांचे तत्त्व आजही समोर ठेवून राष्ट्रासमोरील आतंकवादासारख्या समस्या सोडवायला हव्यात ! – संपादक)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !