नम्र आणि संतसेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करणारे चि. संकेत भोवर आणि तळमळीने सेवा करणारी अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती श्रद्धा असलेल्या चि.सौ.कां. पूजा शिरोडकर !

१८.४.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारे चि. संकेत भोवर आणि मळगाव, सावंतवाडी येथील चि.सौ.कां. पूजा शिरोडकर यांचा शुभविवाह आहे. त्या निमित्त त्यांचे नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. संकेत भोवर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. सौ. स्नेहा सुनील भोवर (चि. संकेतची आई), कुडाळ, सिंधुदुर्ग.

सौ. स्नेहा सुनील भोवर

१. ‘संकेत त्याला सांगितलेली साधना किंवा सेवा लगेच स्वीकारतो.

२. संकेतमधील नम्रतेचे त्याचे नातेवाईक आणि शेजारी कौतुक करतात.’

१ आ. श्री. सुनील भोवर (चि. संकेतचे वडील, वय ६४ वर्षे), कुडाळ, सिंधुदुर्ग.

श्री. सुनील भोवर

१. ‘संकेत आश्रम जीवन जगत असतांना त्याच्यामध्ये बरेच पालट झाले.

२. त्याला कपड्यांचे आकर्षण नाही. तो प्रत्येक वस्तू जपून वापरतो.’

१ इ. कु. वैभवी सुनील भोवर (चि. संकेतची बहीण, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय २७ वर्षे)

कु. वैभवी भोवर

१ इ १. काटकसरी : ‘संकेतदादाकडे अनावश्यक वस्तू नसतात. त्याला ‘एखादी वस्तू हवी का ?’, असे विचारल्यास तो वस्तू आवश्यक असल्यासच घेतो.

१ इ २. नम्रता : संकेत माझा मोठा भाऊ आहे. त्याला काही घ्यायचे असल्यास किंवा साधनेतील काही विचारायचे असल्यास तो मला सहजतेने आणि नम्रतेने विचारतो. ‘त्याच्यातील विचारण्याची वृत्ती आणि नम्रता’ पाहून साधकांना ‘तो माझा लहान भाऊ आहे’, असेच वाटते. तो इतरांशी बोलतांना आवश्यक तेवढेच आणि विचार करून बोलतो.

१ इ ३. मनमोकळेपणा : संकेत मागील ४ वर्षांपासून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करायला लागल्यापासून त्याच्यात पुष्कळ पालट झाला आहे. तो स्वतःहून इतरांशी बोलणे आणि सर्वांमध्ये मिसळणे, असे प्रयत्न करतो. तो त्याच्या मनात येणार्‍या विचारांविषयी संतांशी बोलतो. पूर्वी त्याच्यात मनमोकळेपणा नव्हता. ‘सद्गुरु आणि संत यांनी त्याला दिलेले प्रेम अन् त्याची ‘साधनेत पुढे जाण्यासाठी संतांचे साहाय्य घ्यायचे आहे’, ही तळमळ, यांमुळे त्याच्यात पालट झाला आहे.’

२. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘संकेतमध्ये अव्यक्त भाव आहे. तो अबोल आहे; मात्र तो प्रतिभावान कवी आहे. त्याने गुरुदेवांविषयी केलेल्या कवितांमधून त्याचा भाव प्रकट होतो. त्याच्यातील भावाची अनुभूती त्याच्या कवितांमधून घेता येते.

२. तो साधनेतील अडचणी विचारतो. त्यामुळे त्याला पुढील प्रयत्न करायला दिशा मिळते. ‘देवाने मला त्याच्यासारखा आध्यात्मिक सखा दिला’, त्याबद्दल देवाच्या चरणी कृतज्ञता !’

२ आ. श्री. संजय जोशी, कुडाळ, सिंधुदुर्ग

२ आ १. संतसेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे : ‘संकेतदादा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. सौरभ जोशी (सनातनचे विकलांग संत, वय २७ वर्षे) यांना अंघोळ घालण्याच्या सेवेसाठी येत असे. त्याचा पू. सौरभदादांची सेवा चांगली होण्यासाठी नेहमी प्रयत्न असे. त्याला सेवेविषयी काही लक्षात आले नाही, तर तो विचारून घेत असे. तो सेवा झाल्यावर लगेच गेला, असे कधी झाले नाही. तो क्षमायाचना करून आणि ‘पू. दादा येतो’, असे सांगूनच तेथून निघत असे.’

—————

चि.सौ.कां. पूजा शिरोडकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. कु. भक्ती पांगम नेमळे, सावंतवाडी.

१ अ. सेवेची तळमळ : ‘आम्ही दुकानात सणांविषयी माहिती देणारा फलक लावतो. एखाद्या सणाविषयी भित्तीपत्रक उपलब्ध नसल्यास पूजा खोक्यांचे पुठ्ठे एकत्र करून ते एकमेकांना जोडते. ती त्यावर पाठकोरे कागद चिकटवते आणि त्यावर सुंदर हस्ताक्षरात माहिती लिहून फलक सिद्ध करते.

१ आ. इतरांना साहाय्य करणे : एकदा एका शिबिराच्या वेळी पूजाकडे शिबिर स्थळाच्या शुद्धीकरणाची सेवा होती. तेव्हा पूजाची प्रकृती बरी नसल्याने ती शिबिराला येऊ शकत नव्हती. तेव्हा तिने शुद्धीकरण सेवेची व्याप्ती काढून आवश्यक ते सर्व साहित्य मला पिशवीत भरून दिले.’

२. कु. दिव्या विजय शिंत्रे, पिंगुळी, कुडाळ

२ अ. ‘पूजामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.’

३. सौ. अंकिता चंद्रकांत राऊळ, सावंतवाडी

अ. ‘कु. पूजा मितभाषी आहे.

आ. ती नम्रतेने बोलते.

इ. ती कधीही मायेतील आणि व्यावहारिक गोष्टी बोलत नाही.

ई. मला तिच्या सहवासात सेवा करतांना उत्साह जाणवतो.’

४. सौ. दिया देवदत्त शिरोडकर, मळगाव, सावंतवाडी.

अ. ‘पूजा सर्वांशी मिळून-मिसळून रहाते. त्यामुळे ती सर्वांनाच आपलीशी वाटते.

आ. पूजा सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असते. ती प्रत्येक कृती आणि सेवा गुरुदेवांना आळवून, तळमळीने आणि परिपूर्ण करते.

इ. तिची कठीण प्रसंगात ‘गुरुदेव समवेत आहेत. ते सर्वकाही सुरळीत करतील’, अशी दृढ श्रद्धा आहे.

५. सौ. रश्मी रमेश कविटकर, सावंतवाडी.

अ. ‘पूजाताई आणि मी सणांविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचने घेत होतो. तेव्हा तिने म्हटलेली प्रार्थना, प्रवचन आणि कृतज्ञता जिज्ञासूंना आवडत असे.

आ. तिला तिची चूक सांगितल्यास ती लगेच स्वीकारते.’

६. सौ. पल्लवी पेडणेकर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

६ अ. शिकण्याची वृत्ती : ‘पूजाने अल्प कालावधीत सत्संग घेणे, वैयक्तिक संपर्क करणे, प्रथमोपचार कसे करायचे ?, त्याविषयी शिकणे, बिंदूदाबन करणे, स्वरक्षण प्रशिक्षण घेणे इत्यादी सेवा आवडीने शिकून घेतल्या.

६ आ. अनासक्त : तिचा विवाह जमल्यानंतर अन्य मुलींप्रमाणे ती मायेतील विषयांत न रमता तिने सेवा पूर्ण करण्याकडे प्राधान्य दिले. तिला कपडे, अलंकार किंवा पैसे यांची आसक्ती नाही.

६ इ. गुरूंप्रती भाव : तिच्या विवाहात काही अडचणी आल्यावर तिने निराश न होता सर्व भार गुरुदेवांवर सोपवला. ‘गुरुदेवांच्या इच्छेने सर्व होईल’, असे म्हणून ती सतत वर्तमानकाळात रहाते. ती प्रतिदिन गुरुदेवांच्या चरणांवर सूक्ष्मातून डोके ठेवून झोपते. ती सत्संग आणि शिबिरात प्रार्थना अन् भावजागृतीचे प्रयोग सांगते, तेव्हा ऐकणार्‍यांची भावजागृती होते. तिची ‘अखंड गुरुसेवा करायला मिळावी’, अशी इच्छा असते.’

७. गुरुकृपेने तुज आध्यात्मिक जीवनसाथी लाभला ।

ध्येय तू घेतलेस पोचण्याचे गुरुचरणी ।
अनेक संकटे आली चालतांना ध्येयप्राप्तीच्या मार्गावरती ।। १ ।।

मात त्यावर तू केलीस गुरुदेवांवर दृढ श्रद्धा ठेवूनी ।
पूर्णवेळ साधना करण्याची तुझी इच्छा गुरुदेवांनी पूर्णत्वास नेली ।। २ ।।

काय वर्णावी ही गुरुलीला अगाध ।
नेण्या आपुल्या चरणी धाडियले संकेतरूपी साधकपुष्प ।। ३ ।।

वररूपात संकेत तुज लाभला ।
आनंदाचे डोही आनंद तरंग जाहला ।। ४ ।।

गुरुकृपेने तुज आध्यात्मिक जीवनसाथी लाभला ।
तळमळीने करूनी साधना व्हावे एकरूप तू गुरुचरणांशी ।। ५ ।।

संकेतच्या साथीने श्रीमन्नारायणाची सेवा करूनी ।
आध्यात्मिक जीवनात घे उंच भरारी ।। ६ ।।

हीच सदिच्छा तुमच्या विवाहदिनी ।

– कु. भक्ती पांगम, सावंतवाडी

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.३.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक