राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आल्यावर व्लादिमिर पुतिन यांचा आक्रमक पवित्रा !
कीव्ह (युक्रेन) – रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन दोन वर्षे उलटली आहेत. रशियाने २१ मार्चच्या पहाटे पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात किमान ८ जण घायाळ झाले आहेत. अनेक निवासी इमारती आणि औद्योगिक आस्थापने यांची हानी झाली आहे.
सौजन्य Oneindia News
रशियाने हायपरसॉनिक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी आक्रमण केल्याचे युक्रेनच्या सैन्यदलाने म्हटले आहे. कीव्ह शहराचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले की, रशियाच्या आक्रमणाला युक्रेनच्या हवाई दलाने प्रत्युत्तर दिले आणि त्याची क्षेपणास्त्रे पाडली. या क्षेपणास्त्रांचा ढिगारा शहराच्या विविध भागांमध्ये पडला. रशियाच्या आक्रमणापासून देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिकी साहाय्याची आवश्यकता आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी पश्चिमी देशांना उद्देशून म्हटले.