चिपळूण – कळवंडे धरणात उन्हाळ्यात शेतकर्यांसाठी आवश्यक असणारा पाणीसाठा करण्याचे आश्वासन लघु पाटबंधारे विभागाने दिले होते; मात्र सध्याच्या स्थितीला धरणात केवळ १५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे कळवंडे पंचक्रोशीत पुढील ३ मासांत शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उद्भवणार आहे.
धरणदुरुस्ती झाली नसतांनाच कालव्याची कामे चालू करण्यात आली आहेत. धरण दुरुस्ती होत नसल्याच्या कारणास्तव कळवंडेसह पाचाड, रेहेळभागाडी वैजी आणि कोंडे गावांतील अनुमाने १० सहस्र ग्रामस्थांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. धरणदुरुस्ती नंतरच कालव्याचे काम चालू करण्याची मागणीही कळवंडे येथील दत्त मंदिरात झालेल्या बैठकीत चार गावांच्या ग्रामस्थांनी केली आहे.
संपादकीय भूमिकापायाभूत सुविधांसाठी जनतेला पुन: पुन्हा आंदोलन करावे लागणे आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकायला लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |