Muslim Demand Tirupati Pooja : आम्हालाही तिरुपती व्यंकटेश्‍वराची सेवा करण्याची संधी द्या !

मुसलमानांची तिरुपती देवस्थानम् मंडळाकडे मागणी !

तिरुपती मंदिर

तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील तिरुमला तिरुपती देवस्थानम् मंडळाने, ‘व्यंकटेश्‍वराची सेवा करण्यासाठी मुसलमानांकडून विनंती केली जात आहे’, अशी माहिती दिली आहे. मंडळाने म्हटले आहे की, आम्ही मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या मुसलमान भाविकांसाठी तिरुपतीची सेवा करण्याचे मार्ग शोधू. मुसलमान भाविकांच्या विनंतीवरून आम्ही असे करत आहोत. ही एक प्रकारचा कारसेवा आहे, ज्यामध्ये मंडळ भाविकांना मंदिराशी संबंधित सेवा देते. यासाठी त्यांना नोंदणी करावी लागेल. या सेवेअंतर्गत, मंदिर प्रशासन अशा भक्तांना वाहतूक, स्वच्छता, अन्नप्रसादम् आणि इतर ६० हून अधिक सेवा देऊ शकते.

आंध्रप्रदेशातील नायडुपेट्टा येथील रहिवासी हुसेन भासा यांनी मंडळाकडे अर्ज केला होता की, त्यांना तिरुपती मंदिरामध्ये सेवा करण्याची संधी देण्यात यावी. याविषयी मंडळाचे कार्यकारी अधिकारी व्ही. धर्मा रेड्डी यांनी सांगितले की, मंडळ याविषयी चर्चा करून शक्यता पडताळून पाहील. ही आनंदाची गोष्ट आहे की, इतर धर्माच्या लोकांचीही भगवान व्यंकटेश्‍वरावर श्रद्धा आहे आणि त्यांना त्याची पूजा करायची आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील मुसलमानांचे पूर्वज हे हिंदूच होते. त्याचे भान भारतातील काही मुसलमानांना आहे, हेच यातून दिसून येते. ‘अशांना सेवा करण्याची संधी देण्यापूर्वी त्यांच्यासमोर मंदिरात पाळणार्‍या अटीही समोर ठेवणे आवश्यक आहे’, असे काही हिंदूंना वाटते !