Pakistan Terrorism : पाकिस्तानात वर्ष २०२३ मध्ये आतंकवादामुळे सर्वाधिक मृत्यू

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये वर्ष २०२३ मध्ये आतंकवादामुळे १ सहस्र ५२४ नागरिकांचा मृत्यू झाला असून ही गेल्या ६ वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती पाकिस्तानमधील ‘सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज’ या संस्थेने तिच्या वार्षिक अहवालात दिली.

या अहवालानुसार वर्ष २०२३ मध्ये ७८९ आतंकवादी आक्रमणे झाली. मृत्यू पावलेल्या १ सहस्र ५२४ जणांमध्ये १ सहस्र सर्वसामान्य नागरिक, तर उर्वरित सुरक्षा यंत्रणांचे सैनिक यांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये यापूर्वी वर्ष २०१८ मध्ये आतंकवादामुळे आत ाइतके नागरिक मृत्यूमुखी पडले होते. पाकमध्ये वर्ष २०२१ पासून आतंकवादी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढत असून खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान हे भाग हिंसेची केंद्रे बनली आहेत. या दोन भागांतच ८४ टक्के आतंकवादी आक्रमणे झाली आहेत.

संपादकीय भूमिका

पाकने जे पेरले, तेच आता तेथे उगवत आहे !